जयसिंगपूर प्रतिनिधी:- आज शिरोळ येथे तहसील कार्यालयात नायब तहसीलदार श्री योगेश जमदाडे साहेब यांना राष्ट्रवादी विद्यार्थी चे प्रदेश संघटक मुबीन मुल्ला आष्टेकर यांनी जयसिंगपूर शहर व परिसरात प्रदूषण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा अशा मागणीचे निवेदन दिले या निवेदनात मुल्ला आष्टेकर यांनी म्हटले आहे की, जयसिंगपूर शहरात व परिसरात पडणाऱ्या काळ्या राखेमुळे व कोल्हापूर रस्त्या लगेच असणाऱ्या स्टोन क्रेशर च्या धुळीमुळे प्रदूषण वाढत आहे सदर प्रदूषणामुळे गंभीर आजार होण्याची लक्षणे दिसत आहे या शहराला प्रदूषण मुक्त करण्याची संकल्पना फार गरजेची आहे जयसिंगपूर शहरात तसेच संभाजीपूर चिपरी कोंडीगिरी नांदणी अशा विविध ग्रामीण भागात घोडावत गुळ फॅक्टरी च्या बॉयलरची काळी राख पडत आहे त्यामुळे राहणीमान बिघडले आहे. माणसाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे अपायकारक आहे तसेच कोल्हापूर रस्त्यालगत असणारे स्टोन क्रेशरमुळे धुळीचे ही प्रमाण वाढले आहे यामुळे प्रदूषण ही वाढत आहे. या स्टोन क्रेशर मध्ये शासकीय नियमानुसार उपाययोजना केलेल्या नाहीत त्यामुळे सदर स्टोन क्रेशरांवर तात्काळ कारवाई करून परवाने रद्द व्हावेत अन्यथा लवकरच उपोषण करण्यात येईल याला प्रशासन जबाबदार राहील याची गांभीर्य नोंद घ्यावी असा इशारा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक मुबीन मुल्ला आष्टेकर यांनी दिला.
रामकृष्ण हरी मालू प्राथमिक विद्यामंदिर येथे गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्रीफळ देऊन मुबीन मुल्ला आष्टेकर यांचा सत्कार.
जयसिंगपूर प्रतिनीधी:- आज जयसिंगपूर शहरातील रामकृष्ण हरी मालू प्राथमिक विद्यामंदिर व यशोदा मालू शिशुविकास मंदिर या शैक्षणिक संस्थेच्या विविध गुणदर्शन...