जयसिंगपूर प्रतिनीधी:- आज जयसिंगपूर शहरातील रामकृष्ण हरी मालू प्राथमिक विद्यामंदिर व यशोदा मालू शिशुविकास मंदिर या शैक्षणिक संस्थेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणा म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तसेच माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मुबीन मुल्ला आष्टेकर हे उपस्थित होते.
कलेचे प्रतीक असणाऱ्या नटराजाच्या मूर्तीचे पूजन देखील त्यांच्या हस्ते झाले. शाल श्रीफळ देऊन संयोजकांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांनी मार्गदर्शनही केले यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ गजाला मुल्ला अष्टेकर, शिरोळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार रतन भाई शिकलगार तसेच दैनिक केसरीचे पत्रकार सयाजी शिंदे साहेब, मुख्याध्यापक कोळी सर, संजय सुतार सर उपस्थित होते.