कोल्हापूर प्रतिनिधी :- आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक विभागीय अध्यक्ष यांना 17 नंबर फॉर्म भरण्याची मुदत वाढवण्यात बाबत निवेदन देण्यात आले. सध्याच्या धावत्या युगात शिक्षण फार महत्त्वाचे आहे आणि त्याची गरज सर्वसामान्यांना आहे त्याच अनुषंगाने शासनामार्फत विद्यार्थी शिकावेत यासाठी 17 नंबर फॉर्म भरून खाजगी विद्यार्थ्यांना बारावीचे शिक्षण देण्याचा संकल्प आहे. त्याच अनुषंगाने बारावी साठी 17 नंबर फॉर्म भरून प्रवेश घेता येतो त्याची मुदत आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी संपत आहे पण आपणास मनःपूर्वक विनंती आहे की, विद्यार्थ्यांच्या विविध कारणामुळे तसेच दीपावलीच्या सणामुळे अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहणार आहेत तरी आपण सदर फॉर्म भरण्याची मुदत वाढवण्यात यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परावर्त करावे. सदर मुदत वाढल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल, अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल याचीही नोंद आपण घ्यावी. सदरच्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता आपण किमान दहा दिवस मुदत वाढवावी अन्यथा विविध मार्गाने आंदोलन उपोषण करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी याला प्रशासन जबाबदार राहील.