प्रतिनिधी मुंबई :- काल मुंबई येथे राज्य मानवी हक्क आयोगात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक मुबीन मुल्ला आष्टेकर व राष्ट्रवादी असंघटित कामगार प्रदेश उपाध्यक्ष सौ गजाला मुल्ला तसेच विविध कार्यकर्त्यांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर सातत्याने अन्याय करणाऱ्या ठाणे पोलिसांनी विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे बहुजनांचे नेते म्हणून महाराष्ट्रभर प्रचलित आहेत ते पुरोगामी विचारांचा वसा आणि वारसा राज्यभर चालवत असतात मनुवाद्यांच्या विरोधात ते लढत असतात.
जिथे जिथे अन्याय होतो, तिथे तिथे आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असतात. सध्याच्या सरकारला आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि समाज प्रबोधनातून जाब विचारण्याचा प्रयत्न डॉक्टर जितेंद्र आव्हाड करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर वारंवार खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सरकार पोलिसांच्या माध्यमातून करत आहे त्यामुळे पोलीस हे राजकीय दबाव तंत्राला बळी पडत आहेत यात मात्र शंकाच नाही.
परवाच उल्हासनगर येथे सिंधी समाजाचा अपमान केला म्हणून व्हिडिओ मोर्फ करून जितेंद्र आव्हाड साहेबांची बदनामी व त्यांच्यावर खोटी एफ. आय. आर. दाखल करण्यात आली पोलिसांनी संबंधित व्हिडिओची कोणतीही शहानिशा केली नाही. शेवटी व्हिडिओ चुकीचा आहे, डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा आहे हे माहीत असताना देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तसेच डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा ठाणे पोलिसांनी दाखल केला आहे. त्यामुळे लोकशाही व संविधान धोक्यात आहे. एखाद्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार होत आहे हे आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे राज्य मानवी हक्क आयोगाला विनंती करतो की, पोलीस प्रशासनाची मनमानी कारभार आपण थांबवा आणि राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप बंद करून “सदरक्षणाय खलनिग्रनाय” या वाक्याचा अर्थ समजून घेत पोलीस प्रशासनात कार्य सुरू राहावे, तसेच संदर्भित विषयास अनुसरून ठाणे पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी. सदर तक्रार पत्रावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक मुबीन मुल्ला अष्टेकर, राष्ट्रवादी (अकासे) प्रदेश उपाध्यक्ष गजाला मुल्ला, आरोग्य हक्क समितीचे सुरज पवार, गणेश नलवडे आदी उपस्थित होते.