बीड प्रतिनिधी:- बीड जिल्ह्यातील बालाघाटाचे पर्वत रांगेत समावेश असल्याने हे निसर्गप्रेमी नागरिकांना हिरवळीने नटलेल्या बालाघाट नेहमीच खुणावत असतो मात्र बेसुमार वृक्ष तोडीने बालाघाटाच्या डोंगर माथां उजाड होत चाललेला होता प्रत्येकाला ह्यांच्यासाठी काहीतरी करावे असे वाटत होते मात्र हा फक्त विचारचं राहुन जात होता.मात्र बालाघाटातील नेकनुर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून खाकी वर्दीतील वृक्षप्रेमी अधिकारी मा.लक्ष्मण केंद्रे यांनी पदभार घेतला व त्यांनी वृक्षप्रेमी नागरिकांसोबत स्वता पुढाकार घेऊन वृक्षलागवडची चळवळ उभी केली होती.
त्यांनी फक्त वृक्षलागवडच नाहीतर रोपांची संगोपनाचीही जबाबदारी निच्छित करून वृक्ष लागवड करण्याची चळवळीला लोकचळवळीत परवर्तीत करून,उजाड डोंगर,राष्ट्रीय महामार्ग, गावातील रस्ते, बाजारतळ,पोलीस स्टेशनचा परिसर,अश्या अनेक मोकळ्या जागेत ७५ हजार पेक्षा जास्त रोपांची लागवड करून त्याचे संगोपन ही केल्याने आजच्या घडीला ते रोपे रखरखत्या उन्हात तग धरून असल्याचे दिसून येत आहे. त्या वृक्षांच्या माध्यमातून काही काळ नागरिकांना विसावा घेण्यासारखा सावलीही उपलब्ध झाल्याचे दिसुन येत आहे. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.लक्ष्मण केंद्रे साहेबांच्या दुरदृष्टीनेच शक्य झाल्याची भावना सर्वसामान्यांतुन व्यक्त करण्यात येत आहे..