जयसिंगपूर प्रतिनिधी:- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश संघटक व माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची निष्ठावंत समजले जाणारे मुबीन मुल्ला आष्टेकर यांच्या पत्नी सौ. गजाला मुबीन मुल्ला यांची राष्ट्रवादी काँग्रेस (असंघटित कामगार) सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीचे पत्र या सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री. विलास बडवाईक यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्नाखाली व काम्रेड दत्ता सामंत यांचा आदर्श समोर ठेवून राज्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी राज्यभरात काम करण्यास आम्ही मागे हटणार नाही व सांगली कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचे काम आम्ही करू अशी ग्वाही नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष सौ गजाला मुल्ला अष्टेकर यांनी दिली.
त्यांच्या निवडीने मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण झाले आहे तसेच सौ. मुल्ला यांचे माहेर सांगली जिल्ह्यातील असून त्या एका शेतकरी कुटुंबातील आहेत. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिरोळ तालुक्यात मजबुतीने काम करेल व त्यासाठी जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व नेत्यांना एकत्रित करण्याचे काम आम्ही करू व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रथम क्रमांकावर आणू असे आश्वासन देखील मुल्ला यांनी दिली यावेळी त्यांचा सत्कार करताना वंचित बहुजन आघाडीचे माजी प्रवक्ते दिगंबर सकट, प्रदेश सरचिटणीस जुबेर मुजावर, प्रदेश संघटक मोबीन मुल्ला अष्टेकर, रिजवान चीकोडे, आरोग्य हक्क समितीचे सुरज पवार, सोहेल मुल्ला, अनिकेत जाधव आदी उपस्थित होते.