जयसिंगपूर प्रतिनिधी:- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक मुबीन मुल्ला-आष्टेकर यांनी आज जयसिंगपूर नगरीचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, जयसिंगपूर नगरपरिषद पाणीपुरवठा विभागात असणाऱ्या दोन अग्नीशमन दलाच्या गाड्या आहेत. या गाड्यांना नगरपालिकेच्या पैशातून डिझेल पुरवला जातो तसेच कर्मचाऱ्यांचा पगारही दिला जातो. पण सध्या या नगरपालिकेत वाहन विभागात कार्यरत असणारे श्री. मोहन पाटोळे हे जयसिंगपूर नगरपालिका हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर 51 येथे नवीन घराची बांधणी करत आहेत यासाठी सकाळी व सायंकाळी नगरपालिकेच्या पाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो याचा कोणताही हिशोब नगरपालिकेकडे उपलब्ध नाही.
लोकसेवक मालक नाहीत ही गोष्ट लोकसेवकांनी लक्षात घेतली पाहिजे. शिवाय श्री. मोहन पाटोळे प्लॉट नंबर 51 नगरपालिका हौसिंग सोसायटी यांचा बांधकाम परवाना तपासून या बांधकामात असणाऱ्या नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाईपलाईन कशा स्वरूपात आल्या? व त्यासाठीb लागणारी कागदपत्रे व कनेक्शन याबाबत सविस्तर माहिती तपासून घेऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी. याबाबतले मी सर्व पुरावे पाहिले आहेत. आपण जर कारवाई तात्काळ केली नाही तर मला लोकशाही मार्गाने विविध मार्ग अवलंबावे लागतील. यासाठी मला मंत्रालयापर्यंत धाव घ्यावी लागेल त्यामुळे प्रशासनाने तात्काळ सदर निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. सदर निवेदनाचे लेखी उत्तर तात्काळ करावी.