जयसिंगपूर प्रतिनिधी:-जयसिंगपूर शहरात गॅस्ट्रो या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे जयसिंगपूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे शहरात दूषित पाण्याचे प्रमाण वाढले आहे यामुळे गॅस्ट्रो सारखा आजार पसरला आहे
नगरपालिका प्रशासन हे अकार्यक्षम असल्याचे दिसून येत आहे यामुळे आज जयसिंगपूर नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले नगरपालिका प्रशासनाने तात्काळ संदर्भित निवेदनाची दखल घेत कारवाई करावी.
असी मागणी श्री. मुबीन शौकत मुल्ला (आष्टेकर)
प्रदेश संघट राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र आव्हाड युवा मंच, महाराष्ट्र प्रदेश यांनी केली आहे..